Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shanti Gurav

Classics

3  

Shanti Gurav

Classics

असे जगायचे असते

असे जगायचे असते

1 min
182


जीवन हे असेच जगायचे असते,

दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायचे असते


अश्रूंना पापण्यांच्या आड लपवायचे असते,

ओठावर सतत हसू ठेवायचे असते


आलेल्या संकटांशी भेटायचे असते,

निराश होऊन मध्येच बसायचे नसते


कधी स्वतःच्या इच्छेला बाजूला सारायचे असते,

दुसऱ्यांच्या इच्छापूर्तीतच धन्यता मानायचे असते


नातेसंबंधांना काचेच्या भांड्यासारखे जपायचे असते,

तडा जाणार नाही याची काळजी घ्यायची असते


सदा दुःख दुःख म्हणत रडायचे नसते,

दुःखातच सुख शोधायचे असते


वेळेची किंमत करायची असते,

वेळेच्या पुढे धावायचे नसते


आयुष्यात सर्व काही मिळत नसते,

जे मिळेल त्यातच समाधान मानायचे असते


विखारी नजरा अन विचारांपासून सांभाळायचे असते,

गरज पडल्यास त्यांच्याशी लढायचे असते


नशिबाच्या पाठी धावायचे नसते,

आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायचे असते


जिद्द आणि हिम्मत यात खरी ताकद असते,

'अपना हात जगन्नाथ ' यावर विश्वास ठेवायचे असते


जीवन हे एकदाच जगायचे असते,

मात्र त्यावर शतदा प्रेम करायचे असते



Rate this content
Log in