Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shanti Gurav

Others

3  

Shanti Gurav

Others

असे हे प्रवास करणारे

असे हे प्रवास करणारे

1 min
135


पहाटेच्या गजराबरोबर धडपडत उठणारे

घड्याळाच्या सरकत्या काट्याकडे पाहत धावणारे.

फलाटावर आलेली गाडी धावत पकडणारे

गाडी चुकली तर कपाळावर हात मारणारे.

गर्दीतून यशस्वीपणे आत शिरणारे

मिळाली जागा तर ठीक नाहीतर चौथ्या सीटवर समाधान मानणारे.

धक्का लागला म्हणून तोंडाचा पट्टा सोडणारे

मनातला धुमसणारा राग कोणावरही काढणारे.

कधी एकमेकांशी शिळोप्याच्या गप्पा मारणारे

तर कधी मंद वाऱ्याबरोबर डुलकी काढणारे.

विक्रेत्यांच्या अस्तित्वावर प्रश्न उठवणारे

मग त्यांच्याकडूनच स्वस्तातली खरेदी करणारे.

परीक्षा म्हणून पुस्तकांची पाने भरभर चाळणारे

तर काही रोजच्या घडामोडींसाठी वर्तमानपत्रात डोके 

 खुपसणारे.

अवचित माणुसकीचे दर्शन घडवणारे

कधी आपल्याला काय त्याचे म्हणून कानांवर हात ठेवणारे.

गाडी आली नाही म्हणून दगडफेक करणारे

आपल्याच संपत्तीचे नुकसान करणारे.

रोजच उशिरा येणाऱ्या गाडीला शिव्या देणारे

परत त्याच गाडीतून रोज प्रवास करणारे.

संध्याकाळी आपल्याभागल्या शरीराने घरी परतणारे

दुसऱ्या दिवसाची चिंता मनी ठेवून झोपी जाणारे.


Rate this content
Log in