tejashri shingade

Others


3.7  

tejashri shingade

Others


असा असावा तो...!!!

असा असावा तो...!!!

1 min 190 1 min 190

हट्ट करावा मी  

आणि पूर्ण करावा त्याने

असा असावा तो...!!!

रुसून बसाव मी

आणि समजूत काढवी त्याने

असा असावा तो...!!!

आजारी पडाव मी

आणि काळजी करावी त्याने

असा असावा तो...!!!

नखरे करावे मी

आणि सर्व झेलावे त्याने 

असा असावा तो...!!!

खोडी करणारी मी

आणि चिडून बसाव त्याने

असा असावा तो...!!!

दुःखी असणारी मी 

आणि खांदा दयावा त्याने

असा असावा तो...!!!

खुश असणारी मी 

आनंद लुटावा त्याने 

असा असावा तो...!!!

स्वतःकडे दुर्लक्ष करावं मी

आणि म्हणून रागवाव त्याने 

असा असावा तो...!!!

चूक करावी मी 

आणि माफ कराव त्याने

असा असावा तो...!!!

सोबत असावी मी

आणि नात निभवाव त्याने

असा असावा तो...!!!


Rate this content
Log in