Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sharad Kawathekar

Abstract

3  

Sharad Kawathekar

Abstract

अर्थ

अर्थ

1 min
391


जन्म-मृत्यूचा अर्थ उलगडत उलगडत

काळ्या सावळ्या ढगातून

काही ओघळ सुखांचे बिलगत असताना 

काही संदर्भ आणि काही नाती

पुन्हा पुन्हा आठवत राहतात


ते बंध ते अनुबंध

ते संदर्भ ती नाती

ते जखडलेले श्वास 

सगळ्या सगळ्यांचे

अवशेष गळून पडतात

त्या मूक समाधीवर

आणि त्या जन्म मृत्यूच्या 

प्रतिबिंबातला तो काळोख 


एक नवीन स्वगत सांगत 

एक नवा अर्थ उलगडत राहतो

साक्ष सत्याची देत राहतो

गुढतेचे गुपित सांगत राहतो

मौनाची परिभाषा आणि 

खोल डोहातील हुंकार

एक अनामिक ग्वाही देत राहतात

रोज एक नवा अर्थ उलगडत राहतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract