Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priyanka Patil

Abstract

3  

Priyanka Patil

Abstract

अपहरण

अपहरण

1 min
160



फांदी वरती आज पोपट 

आनंदाने बसला होता

मिठू मिठू म्हणत म्हणत

सुखाने बागडत होता......


एके दिवशी काय झाले 

माणूस नावाचा प्राणी आला 

सोन्याचा पिंजरा घेऊन

पोपटाचा अपहरण कर्ता झाला.....


बिचारा पोपट धाय मोकलून

मिठू मिठू करू लागला 

अपहरण आहे झाले माझे 

बांधवांना आपल्या सांगू लागला....


माणूस आनंदाने त्याला 

घरी आपल्या घेऊन गेला 

गिफ्ट तुझ्यासाठी आणले म्हणून 

लेकरासमोर मिरवू लागला......


पोपट बिचारा कळवळला 

सोड म्हणून विनवू लागला 

तुझं काय मी बिघडवलं म्हणून 

स्वातंत्र्य माझं हिरावू लागला? 


माणूस वदला,अरे तुझ्यासाठी 

सोन्याचा मी पिंजरा केला

सोबत पेरू ,डाळिंबे 

सुकामेवा ही झकास वाढला....


पोपट हिरमुसला म्हणाला 

असले सुख नको मला 

स्वातंत्र्याच्या बदल्यात माझ्या 

असा रितीरिवाज हवा कशाला? 


तुझा पोरगा पळवून नेला

जगशील कसा सांग म्हणाला 

तसंच माझ्या हे काळजीपोटी 

असेल आई-बाबांचा जीव कळवळला.....


तुला खोलीत कोंडून ठेवले 

पंचपक्वानाचा डाव मांडला 

अन्न गोड लागेल का तुला? 

बिचारा पोपट विचारू लागला......


काय करायचा सांग तुझा हा 

सोन्याचा पिंजरा अनमोल 

जीव माझा कसा रमेल 

आप्तांशिवाय सारच काडीमोल.....


अपहरण करून कुणाचे 

आनंद कसा घेता येईल 

माणसा तुझ्या आनंदासाठी

इतरांचा मात्र जीव जाईल.... 


सोड मला मोकळे कर 

आनंदाने बागडू दे 

आप्तांच्या सोबतीने माझ्या 

खुशी खुशी ने नांदू दे.... 


बोल ऐकून पोपटाचे 

माणूस आता गहिवरला 

पिंजऱ्याचे दार उघडून 

जा... निवांत जग म्हणाला!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract