अंतर
अंतर
सांगा काय कुठे चुकले ?
नाते नाते तुटतच गेले
सारे गणित कसे चुकले ?
नात्याचे अंतर वाढतच गेले ..
काका मामा आत्या, मावश्या
सारे सारे दूर दूर पळाले
सोशल मिडीयाचा आधार
नात्यांचे अंतर वाढतच गेले...
पैशाला अनन्य साधारण
नको तेव्हढे महत्त्व आले
भाऊ भाउही भांडत राहिले
नात्यांचे अंतर वाढतच गेले ...
मुले निघाली परदेशात
आई बाप पोरके झाले
वृद्घाश्रमाचे दरवाजे खुले झाले
नात्यांचे अंतर वाढतच गेले...