अंगणात माझ्या
अंगणात माझ्या

1 min

12K
जमवल्या होत्या
ओंजळीभर कळ्या
अंगणात माझ्या
देण्यासाठी तुला
मोती गाळूनी दवाचे
नेसूनी अंगभर वसने
किरणांची ह्या सोनेरी
होत्या सजल्या अंगणात माझ्या
गडद रंग ह्या कळ्याचे
पाकळ्या पाकळ्यात ह्या
साठवण करुनी सुगंधाची
कळत उमलल्या अंगणात माझ्या
ओंजळ भरूनी हाती
आपसूकच सांडली
रांगोळी मांडली मी
अंगणात माझ्या