Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umakant Kale

Others

2.0  

Umakant Kale

Others

अंगण

अंगण

1 min
8.3K


हरवलं माझं अंगण हो बाई

कुठे कुठे शोधू त्याला ग मी।।धृ।।

आठवते पुर्वी घरासमोर

असायचे हो अंगण

रोज उठून बाई मग

करायची सडा-सारवण

हरवलं माझं अंगण हो बाई

कुठे कुठे शोधू त्याला ग मी।।१।।

सुवासिक रंगाची रंगोळी

रेखाटयाची त्या अंगणी

हातच्या कलेनी घेऊन रंग हाती

उजळायची हो ती सुख-सम्रुद्री अंगणी

हरवलं माझं अंगण हो बाई

कुठे कुठे शोधू त्याला ग मी..।।२।।

तुलसी वृदावनी पुजूनी

अंगणात रोज ती दिवा लावायची

मुलांना काखेत घेऊन

भक्तीनी फेऱ्या मारायची

हरवलं माझं अंगण हो बाई

कुठे कुठे शोधू त्याला ग मी।।३।।

हल्ली शहरात वाढल्या इमारती

प्लँट सिस्टिमने हिरावले अंगण ही

अबोला नांदतो मग मोठं-मोठ्या इमारती मधी

नाही उरला आता शेजार धर्म ही..

हरवलं माझं अंगण हो बाई

कुठे कुठे शोधू त्याला ग मी ।४।।


Rate this content
Log in