STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Tragedy

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Tragedy

अंधारात या

अंधारात या

1 min
0

अंधारात या...

 झाला अंधार सारा
 कळणार तुम्हा केव्हा
 अंधारात या अशा
 दिवे लावून ठेवा...

 ओळखणारे नाही
 कोणी येथे कुणाला,
 रक्ताचे ते नाते काय ते
समजून त्यांना दावा...

 विसरुनिया भान जे
चुकतील वाटा कोणी ,
चुकलेल्या माणसांना
 तुम्ही च वाट दावा...

 लोभापोटी कोणी
 घेतील जीव कोणाचे
 दुष्टांसाठी त्या ही
 शस्त्र जरुर ठेवा...

 अबलेस कुठे कधी
 छळतील दुष्ट कोणी,
 रक्षण करण्या तेथे
 अवतार तुम्हीचं घ्यावा...

 नित्य जे कोणीकरतील
कुणावर अन्याय
 लढण्यासाठी बाहूत
 ताकद राखून ठेवा...

 विसरुनी या माणूसकी
 जे असतील वागणारे
 त्या दानवांना खरा
धडा तुम्हीच दयावा.. .

जन्मास असा यावा
कोणी एक हिरा,
अंधारात त्या दिवा
आता एक हवा...

 अशी ही वेळ येईल
 पेटतील मग मशाली,
नसणार अंधार तेव्हा
 येईल काळ नवा...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama