Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Action Classics Inspirational

3  

Shobha Wagle

Action Classics Inspirational

अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा

अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा

1 min
189


पंधरा ऑगस्ट एकुणशे सत्तेचाळीसला

ब्रिटिश राजवटीतून भारत मुक्त झाला

दिडशे वर्षे पारतंत्र्यातले हाल सोसुनी

वीरांच्या बलिदानाने स्वतंत्र काळ आला


आज अमृत महोत्सव भारत स्वातंत्र्याचा

बघा कोणत्या सुखसोयी लाभल्या देशाला

राज्य घटना आली संविधानच्या कायद्याने

बंधुत्व, समानता आणि एकता भारतीयाला


उत्कर्ष जाहला भारताचा जगाच्या नकाशात

पंचवार्षिक योजनेनुसार झाली बरी भरभराट

सायन्स,तंत्रज्ञान,शैक्षणिक नि अंतराळ विश्वात

अलौकिक कामगिरी दाखवली करून जगात


सुजलम् सफलम् इतिहास आपल्या भारताचा

ऋर्षीप्रधान देश म्हणुनी हिरवा रंग तिरंग्याचा

पारतंत्र्यात तो राबत होता आजही आहे तिथेच

कर्ज न फेडू शकल्याने आत्मघात करी जीवाचा


बंधूभाव समानता आपण म्हणत असतो सारखे

पण गल्ली-बोळात भांडण तंटा चालते धर्मावर

माणूस माणुसकी धर्म सोडुनी पाळतात सारे धर्म 

लाच लुचपत,भ्रष्टाचार फसवा फसवी एकमेकांवर


आज स्त्री शिक्षित झाली प्रगती झाली म्हणतात

तरी समाजात तिची मानहानी का बरे करतात

दोष स्त्रिचा नसून स्त्रीला गर्भातच का बरे मारतात?

अडाणीचे समजू शकते पण शिक्षीतही का वागतात.!


तिरंगा फडकवा म्हणे घरोंघरी अमृत महोत्सवासाठी

तिरंग्याचे नियम आहेत का कुणाच्या ध्यानी मनी

एक लक्षात ठेवा तिरंगा आहे शान आपल्या देशाची

आण- बान -शान-निगा नीट जोपासावी ती नियमानी


Rate this content
Log in