अजुन मला वाटते
अजुन मला वाटते
अजुन मला वाटते ते दिवस परत यावे
तुझ्या आठवणीत रात्रंदिन झुरावे
तुझ्या मागे धावताना
पावलांची तमा नव्हती
सर्वस्व लुटले मी
काहीही जमा नव्हती
ध्येय तुझे जिंकावे मन बकी सर्व हरावे
तुझ्या आठवणीत रात्रंदिन झुरावे
अजून वाटते मला....
विचारु मी कसा तुला
आवडतो का मी तुला?
स्वप्नात दिसते माझ्या तु
मी ही दिसतो का तुला?
तु नाही म्हणाली तर जगावे की मरावे
तुझ्या आठवणीत रात्रंदिन झुरावे
अजून वाटते मला.....