Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Babu Disouza

Others


3  

Babu Disouza

Others


अजाण

अजाण

1 min 207 1 min 207

माझा बसेना विश्वास

जगू कसा तुझ्या विना

तुझा अखेर निर्णय 

जग शून्य तुझ्या विना

-१-

गणू निष्प्रभ जीवना

अभ्र कसा जलाविना

क्षण विरह वेदना

तुझ्या ग सांत्वनाविना

-२-

ओल हवी रूजावया

फल कसे बीजाविना

माती म्हणे सावराया

गर्भी विरे कसाविना

-३-

 हवी ओळख आधारा

लता कशी तरू विना

 हवी पाळख पाखरा

गंध कसा फुलाविना

-४-

महफिल सुनी सुनी

स्वर लोपे साज विना

गोड जोडी तुझी माझी

अर्थ नसे तुझ्या विना

-५-

तारा दिसे नभी कुणा

 मंद भासे तुझ्या विना

दृष्टी ना नक्षत्र खुणा

तम वेढी तेजाविना

-६-


Rate this content
Log in