Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shekhar Chorghe

Others

2  

Shekhar Chorghe

Others

अगदी मला न सांगताही

अगदी मला न सांगताही

1 min
1.4K


तू ये अशी हळूवार, अलगद 

अगदी मला न सांगताही 

अन् थांब तिथेच काही काळ 

खूप बोलायचंय, मन सारं रितं करायचंय 

किती काळ झाला 

आपण बोललोच नाही 

भिजणार्या पावसात देखील 

तो पाऊसही अता कोरडा झालाय 

डोळ्यांतल्या अश्रूंसारखा 

अन् भावनांचा अस्त झालाय 

अता उरली आहे ती फक्त 'अगतिकता' 

जी पूर्वी होती अश्रू लपविण्यासाठीची 

अश्रूही अता कंटाळलेत बाहेर यायला 

म्हणून उगाच मी भटकतो माझा चेहरा घेऊन 

चंद्र अस्ताला गेलेल्या रात्रीसारखा 

पण मनातला चंद्र फक्त तूच आहेस

अमावस्येपर्यंत खरा चंद्र लोप पावतो 

तसा या चंद्राचा अस्त कधीच होत नाही 

तो सदैव फुललेला असतो 

'पौर्णिमेच्या' रात्रीसारखा 

अन् तेव्हाच तुला म्हणावं वाटतं 

तू ये अशी हळूवार अलगद 

अगदी मला न सांगताही...


Rate this content
Log in