अधीर मी
अधीर मी
या धुंदीत रे सखया
रात्र सारी जागते...
स्वप्नी तुला पाहता
मी मनोमनी बहरून येते...
शांत जाहल्या चारी दिशा
तुझ्या इशाऱ्याची चढली नशा
नयनामधली अबोल लाज
गुपित माझी सांगते
स्वप्नी तुला पाहता
मी मनोमनी बहरून येते...
हळव्या रेशमी तुझ्या पाशात
मंद सूर तरंगती मनात
मृदुल स्पर्शाच्या चांदण्यात या
चिंब चिंब मी प्रकाश नाहते
स्वप्नी तुला पाहता
मी मनोमनी बहरून येते...
उमलते उसासे श्वासही चढे
नको दुरावा मीलनाची आस जागे
अधीर मी अर्पण्या सर्वस्व ते
तुला पाहता स्वप्नी
मी मनोमनी बहरून येते...