Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dinesh Kamble

Tragedy

3  

Dinesh Kamble

Tragedy

अड्जस्टमेंट.

अड्जस्टमेंट.

1 min
394


तिच्या पाचवीला

पूजला गेलेला शब्द म्हणजे...

अड्जस्टमेंट...


ती कुठल्याही वयाची असो.

ती शिक्षित असो वा अशिक्षित.

ती एकाद्या खेडे गावातली असो

वा झगमगत्या मेट्रो शहरातली.


आवर घालावाच लागतो तिला

आपल्या मनातल्या भावनांवर.

आणि

अंगीकारावे लागतं समजूतदारपणाच्या

गोड नावाखाली पुन्हा तेंच

अड्जस्टमेंट .


ती शालेय वयात जेंव्हा असते

तेव्हा अभिमान बाळगते

आपल्या बापावर ,

बापाच्या नावावर, अन

आडनावावर सुद्धा

एकदा लग्नं झालं रे झालं

तिला खोडावे लागते ते नावं

अन जोडावे लागते

एक नावं

त्या अनोळखी इसमाचे

येथे सुद्धा पुन्हा ती

अड्जस्टमेंट.


मग तुम्हीच सांगा .

कश्या पटतील तिला

समानतेच्या गोष्टी ?

सबलीकरणाच्या भंपक कल्पना.?


जर ती रोज , दररोज

पूर्वीपासूनच भोगत आली असेल

सोसत आली असेल

या ढोंगी , बेगडी समाजाद्वारे

दिल्या गेलेल्या लिंगभेदाच्या डांगण्या.

अड्जस्टमेंटच्या नावाखाली..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy