अभ्यास
अभ्यास
1 min
245
करावा अभ्यास |
एकाग्रता चित्ती |
अभ्यासाची भिती |
असू नये ||१||
बालपणी सर्व |
हसा,खेळा,पळा |
अभ्यासाच्या वेळा|
नियमित ||२||
एकच घ्या ध्यास|
करावा अभ्यास |
होशील तू पास |
सदाचिया ||३||
स्वप्न पुर्ण करा |
घ्या उंच भरारी |
बाणा तो करारी |
ठेवावाच ||४||
जिद्द व चिकाटी |
असो सोबतीला |
कवेत यशाला |
घेण्यासाठी ||५||
जिद्दीचे पंख तू |
लाव ना स्वतःला |
लाग अभ्यासाला |
नियमित...||६||