Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Others

4.2  

Yogita Takatrao

Others

आयुष्य

आयुष्य

1 min
573



थेंब थेंब असं

आयुष्य संपताना

कळलंच नाही

अर्धाच राहिला प्याला


मग वाटलं अरेच्च्या

उगाच सांडलं अर्धं

बरचसं वाया गेलं

नाहक झिरपत राहिलं


सुख दुःखाचे शिंतोडे

जमिनीवर पडलेले

काहीसे क्षणभंगुर

बाष्पात विलिन झालेले


थोडं पाणी जपलं आहे

अनुभवाच्या आधारे

पाय लागून सांडेल का?

ह्याचीच खंत आहे


सांडण्या अगोदर ते

पूर्ण उपभोगायचं

वाढणं तर अशक्य

पण आहे तेच जपायचं


एकेक ,प्रत्येक थेंबाचा

आस्वाद घेत रहायचं

व्यर्थ नाही घालवायचं

स्वतःलाच वचन दयायचं


नाही रे वेडया मना

कोणी पाहिला पुढला जन्म?

जे आहे, हेच आहे

वर्तमानाचंच जगणं आहे


सोड तू भूत आणि भविष्य

हा क्षण आपला जग तू

कशाला चिंता करावी

आज आहेस उद्या नाहीस तू




Rate this content
Log in