Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Supriya Devkar

Tragedy Others

3  

Supriya Devkar

Tragedy Others

आयुष्य झाले कमी

आयुष्य झाले कमी

1 min
187


आयुष्य झाले कमी 

मज जगणे समजेना 

नात्याच्या बंधनातील

मज कोडे ऊमगेना ॥१॥


कुतरओढ मनाची

थांबवावी कशी कळेना 

घुसमटलेल्या भावनांना 

वाट मोकळी मिळेना ॥२॥


नात्यातली घालमेल 

कुस्करून टाकली पायदळी

विचारात डोकावताना

पाहते मी सोनसळी ॥३॥


आभासी जीवनाचा का 

शेवट कधी नसावा 

मनाजोगते जगण्याचा 

मज हक्क का नसावा ॥४॥


थोपवलेल्या भावनांना 

कधी होईल कचरा 

पडद्याआड का होईल 

नुसता त्याचा कचरा॥५॥


कसे लढावे जगण्यासाठी 

हातातल्या नशीबासाठी

का समोर पसरावे हात 

दोन वेळच्या भाकरीसाठी॥६॥


कशास हवी वृत्ती नेबळी

हाती ताकद घडण्याची

विश्वासाच्या जोरावर

हिम्मत असे घडण्याची ॥७॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy