आयुष्य एक गणितं
आयुष्य एक गणितं


गुणांना जोडावे !
दोषाला भागावे !!
वजा करावा
तो अहंपणा, !
माणुसकीने गुणावे
माणसांना !!
प्रेमाने सोडवा
ते कोडं
आयुष्याचं!!
कारण आयुष्य आहे
गणित !!2!!
आयुष्य ही
सुखदुःखाची
आकडेमोड !
नका होऊ
तुम्ही चिंतित !!
कारण आयुष्य आहे
एक गणितं!!2!!
आयुष्य एक
कठीण उदाहरण !
पण प्रत्येक
गणिताला असते
सोल्युशन !!
स्वतः करावे
आपले परीक्षण !
विसरू नका
गणितच देतो
पैकीच्या पैकी गुण !!
गुणांची बेरीज
द्वेषाची वजाबाकी
समाधानाचा गुणाकार
विजयाचा करा भागाकार
बना आपल्या
आयुष्याचें आपणच
शिल्पकार !!2!!
नका होऊ
तुम्ही चिंतित !!
कारण आयुष्य आहे
एक गणितं!!2!!