Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sharad Dhangar

Romance

2  

Sharad Dhangar

Romance

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

1 min
1.4K


पाऊस मला देतो आठवण

गोड गुपीत भेटींचीं

हिरवळीतील गारव्यातल्या 

चिंब उबदार मिठींची॥१॥

पाऊस मला देतो आठवण

बेभान तुजसवे भिजण्याची,

ओल्या हिरव्या पाऊलवाटेवर

  तुझ्या सोबत चालण्याची ॥२।।

पाऊस मला देतो आठवण

भिजल्या अबोल क्षणांची,

चिखलातील उमटलेल्या 

नाजुक पाऊल खुणांची ॥३।।

पाऊस मला देतो आठवण 

एका छत्रीत फिरण्याचीं,

झाडाच्या  पान खोडावर  नावे

तुझी- माझी कोरण्याची।।४।।

पाऊस मला देतो आठवण

नकळत निघून गेल्याची,

बरसण्यातून देतो चाहूल  

तू माघारी आल्याची।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance