Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Kale

Others

5.0  

Savita Kale

Others

आठवणीतील क्षण

आठवणीतील क्षण

1 min
442


कोकणात जाऊ नि

चार दिस राहू

ठरलं बुवा आमचं पक्कं

कधी नव्हे ते बिनविरोध चक्कं


वळणाची तेढी ही वाट

संपता संपेना हो घाट

निसर्गाचा दिसे भारी

काय तो न्यारा थाट


माशांच्या कालवणाची पंगत

रात्रीच्या चांदण्यांची संगत

बच्चे मंडळी मग जोरात

आनंदा आलीया रंगत


किना-याची मजा ती काय

निघना तिथून पाय

वेळ कसा गेला बाई

परतीची झाली आता घाई


कोकणातील रम्य आठवण

गुरफटले माझे मन

बिनघोर चार दिन

आवडतात माझा तो क्षण



Rate this content
Log in