Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vimal Patkari

Tragedy

4.5  

Vimal Patkari

Tragedy

आठवणींचा झुला!!

आठवणींचा झुला!!

1 min
209


मनीच राहिली सारी सुखस्वप्ने

भासे ना स्वप्नी ते नशिबा आले !!


सुरेख छान सुमनांनी संसारवेल सजे

जीवनी सुगंधी मोगरा दरवळे 

साथीच्या साथीनं जीवन सारे 

सदाहरित नंदनवनची भासे !!


नीत माझ्या मना संसारी हुरुप हा वाटे 

कधी थकवा ना कधी उदास वाटे 

स्वच्छंदी, सुखद सहवास जीवनी 

मना माझ्या घाली प्रीत मोहिनी !!


संसाराचा रथ कैसा डौलानं चालतसे 

रथी राजा-राणी आणि तीन रत्ने

गोड मधुर आठवणींनी सजलेला रथ 

मना देई माझ्या सख्याचा संदेश !!


छान छान कल्पना रेखाटल्या घरकुलाच्या

गोड गोड गोष्टी दोन जीवांच्या 

गुजगोष्टी साऱ्याच मनी आठवून 

सख्यासवे जणू उभारले घरकुल !!


किती साद घालू ऐकू ना ये मधुर वाणी 

ढोलकी तालीची सुरेल गाणी 

सुखद संगीत सारे आठवुनी

सख्यासवे गाते जणू संसारगाणी !!


वाटे साजणाला शोधुनी आणावे

मनीचे सुख - दु:ख त्यास सांगावे 

परि साजणाचे आता न भेटणे

समजावून मना आठवण झुल्यावर झुलविते !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy