Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priti Dabade

Fantasy Others

3  

Priti Dabade

Fantasy Others

आठवडा

आठवडा

1 min
238


आठवडा शब्दात जरी

येत असले आठ

बनतो तो होऊन

सात वारांची गाठ


वार आवडीचा

रविवार आरामाचा

सोमवार कामाची 

सुरुवात करण्याचा


सोमवारच्या धावपळीने

होते खूप दमछाक

मंगळवारी कसंबसं

रूळावर येतं गाडीचं चाक


दोन दिवस संपता

हजेरी लावतो बुधवार

अर्धा आठवडा संपल्याचा

संकेत देई गुरुवार


शुक्रवारी येई मजा

रविवारची स्वप्नं पाहताना

शनिवारी तर शीणच

येतो कामं आटपताना


सात वारांचा आठवडा

कळत नाही कसा जातो

गोड आठवणींची शिदोरी

मागे मात्र ठेवतो


आठवडाभराची तयारी

रविवारीच करावी लागते

नाहीतर तारेवरच्या कसरतीला

सामोरे जावे लागते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy