आत्मविश्वास
आत्मविश्वास
परिस्थिती नसली तरी चालेल
जगण्यात हवा आत्मविश्वास|
सा-या अडचणींवर मात शक्य
मनगटावर असता खरा विश्वास||१||
आत्मविश्वासाच्या बळावर अनेक
राजे हरलेले जिंकलेत युद्ध पुन्हा|
सारं काही असून आत्मविश्वास
नसता जगणंच होईल गुन्हा||२||
आत्मविश्वास देतो जगण्याचा
नवा दृष्टिकोन प्रत्येक क्षणाला|
आत्मविश्वास नसता जवळ करतो
आपणच आपल्याच सरणाला||३||