Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogini "कृष्णाई"

Romance

2  

Yogini "कृष्णाई"

Romance

आता निघायला हवं

आता निघायला हवं

1 min
31


आता निघायला हवं,

बराच वेळ थांबलो आज,

काही कळते का पाहिलं,

तुझ्या मनातलं गूज...

तुझे डोळेच बोलून गेले सारे,

शब्दांना बहुतेक जागा नव्हती,

एक स्पर्श उरला होता कळण्यासाठी,

मिठी तेवढी पुरली होती...

थांब म्हणू नकोस सखे,

माझे पाऊल अडखळतील,

निरोप पेलवेना झाला,

तर उगाच आसवे ओघळतील...

आता निघायला हवं,

बराच वेळ थांबलो आज...

ही आठवण सोबत घेऊन जातो,

म्हणजे लागेल पुढच्या भेटीची आस...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance