आता अधीसारखे
आता अधीसारखे
1 min
29.1K
आता आधीसारखे
निखळ अवखळ
आरशात काही दिसत नाही ..
सरलेल्या दिवसातले
क्षण आठवायचे
ते जपायचे होते ..
हे कधी सुचलेच नाही..
आता उगाच दोष
द्यायचा कुणा ???
आपले असे
आपणच नाही ..
एवढया गर्दीत
इतके एकटे यापुर्वी
कधी वाटले नाही ...
शब्दसुमनांचे दान दिले
गंध हसले..रंगीत असे की
पदरी काहीच उरले नाही ..
आजचा क्षण न क्षण
हसतोय..पण
त्याच्या आनंदानं ही
मन रमत नाही ...
काय करावे..कुठे उरावे
कुणी असे..कुशीत नाही
आत आधीसारखे
शब्द तरंगातही
काहीच बोलत
नाही ...
ओंजळीत घेतले... तरंग
शब्दांचे...
पण शेवटी ओंजळ
रिती झाली..
तरंगही तिला पुरले नाही..!!!!
