Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

कविराज.अमोल शिंदे पाटिल

Inspirational

3  

कविराज.अमोल शिंदे पाटिल

Inspirational

आसवांच्या खेळात

आसवांच्या खेळात

1 min
543


तुझ्यामुळंच सखे रान आज हे झुरलं

मरण येऊन दारा पुढं का आज हे उरलं

तुझ्या आठवणीत ही रात्र रोज येते

आसवांच्या खेळात तू तर मात्र होते


थेंब थेंब साठून सखे सपान मी पेरलं

मरण येऊन दारा पुढं का आज हे उरलं

वाहणारा वारा सुगंध घेऊन आला

त्यानं ही मस्करीचा पारा वरती नेला


मस्करीनं त्यानं माझं हसू ही पुरलं

मरण येऊन दारा पुढं का आज हे उरलं

साखर झोप माझी मज खुणावत होती

बघ ती ही किती हट्टी नजरेच्या आड येती


तिनं साऱ्या स्वप्नांवर माझ्या पाणी फेरलं

मरण येऊन दारा पुढं का आज हे उरलं

मनाला समजावून जगी वेगळं राहतो

ती नसताना आज मी जरा वेडा वागतो


वेड लागलं तिनं घातलं नसता डोरलं

मरण येऊन दारा पुढं का आज हे उरलं


Rate this content
Log in

More marathi poem from कविराज.अमोल शिंदे पाटिल

Similar marathi poem from Inspirational