आनंदी
आनंदी
आनंदी माझे नाव बाई
मी चालले तोऱ्यात
गावतय का कोणी
माझ्या होऱ्यात
हातात काच
बांगडी किण किण
पायात माझ्या
पैंजण छुम छुम
पेटीकोट आतला
डोकावतो गुडघे झाकून
फ्रॉक त्यावरी
घेतो लाज राखून
पिंजारले केस
माझे उडती वाऱ्यावर
नजर खीळते
लाल मोत्याच्या माळेवर
छोटे छोटे हात माझे
छोटे छोटे पाय
तुडवीत रस्ता जाते
शोधण्या माझी माय
दिसली माय माऊली
मायेची माझी साउली
गालीची खळी खुलली
नजर माझी स्तिरावली
एकटक पाहता तिला
नजरेत ती सामावली
प्रसन्न झाले मनातून बाई
उन्हातच मी आई मिळवली....!!!