आंबा
आंबा
फळांचा राजा आंबा
चवीने असतो मधुर!!
अनेक जाती याच्या
किर्ती पसरली दूरदूर!!
कैरी ची बात निराळी
लोणचे मिरवते घरभर!!
चटक मटक अशी कैरी
संपवी मुले भरभर!!
रंगाने केशरी पिवळा
ताटात याचा सन्मान!!
पंचपकवानात नेहमी
आमरसाचा असे मान!!
मँगो आईस्क्रीम मस्त
फ्रुटी तर आबंटगोड!!
सर्व फळांमध्ये आब्यांची
चविष्ट लागते फोड!!
अशी ख्याती आंब्याची
देशात आणि परदेशी!!
फळाच्या राज्याची
दुनिया दिवानी अशी!!