आला हिवाळा
आला हिवाळा
1 min
755
हिवाळा ऋतू
शिशिर आगमन
हिमपतन
हिवाळा आला
गळू लागली पाने
हिम भाराने
हिवाळ्यामध्ये
धुके दाटते फार
झोंबते गार
ऋतू हिवाळा
थंडीचा हा मौसम
सरेना तम
आला हिवाळा
वाजू लागली थंडी
घालावी बंडी
हिवाळ्यामध्ये
घ्या सात्विक आहार
फळांचे सार
हिवाळ्यामध्ये
निसर्गाचा आनंद
लुटा स्वच्छंद
