Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Umendra Bisen

Abstract Classics Children

3.7  

Umendra Bisen

Abstract Classics Children

आला आला पाउस

आला आला पाउस

1 min
189


आला आला ऋतु पावसाळा

सोसाट्याचा सुटला तो वारा,

तृप्त झाली ही धरणी जरा

वाहू लागल्या त्या जलधारा ।।


येतो नेहमीच पावसाळा

ऋतु आहे सगळ्यात छान,

करी शेतकरी राजा काम

पिकविण्या आपले ते रान


मुलं लहान आनंदी झाली

सर्व चिंब भिजत निघाली,

घेण्या पावसात मौज मस्ती

चिंब चिंब न्हाऊन ती गेली


शालू हिरव्या रंगाची मस्त

धरतीने ती अंगी नेसली,

वृक्ष वेली झाड़ें आनंदाने 

वाऱ्यांसह झुलाया लागली


गंध चौफेर मातीचा येई

दरवळे आसपास खास

मिटे जशी धरणीची हौस

तसा पडे गारांचा पाऊस



Rate this content
Log in