STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Romance

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Romance

आकांत नी आक्रोश.

आकांत नी आक्रोश.

1 min
0

आकांत नी आक्रोश ...

      'पुष्पाग्रज. '

तो होता मोठ्या जातीचा
नी
ती होती खालच्या जातीची
रुप होतं लई देखणं 
जणू चांदणी ती चंद्राची
तिच्या रुपाला पाहून 
गेला वेडा तो होऊन 
तिच्या मागे तो लागला 
दिले लग्नाचे वचन 
जात आडवी आली अन्
गेले नको ते घडून...

मला माहिती नाही पण तुम्हाला मात्र माहित आहे 
तिने च टाकलंय ते नवं जन्मलेलं बाळ
रस्त्याच्या कडेच्या त्या झुडपात ...
कारण जन्म दिलाय तिने त्याला लग्नाच्या आधी...
तिनं करायला नको होतं तसं पण ते केलंय 
अन् जन्मलेलं ते पोटचं बाळ झुडपात टाकून दिलंय ...
फक्त इज्जतीचा सवाल म्हणून भिती आहे तिला समाजाची
पण कलंक नको म्हणून 
समाजाच्या नजरा चुकविण्यासाठी ते ही तिच्या हातून पापच झालंय...
मला ऐकू येतोय त्या छकुल्याचा आकांत नी आक्रोश ...
ऐकू जातंय तिच्या कानाला सारं 
दिसतंय डोळ्याला ही
पण मला माहिती आहे याच समाजाने बंद केलेत तिचे कान 
अन् बांधली आहे पट्टी डोळ्यावर सुद्धा ...
पहा ऐका त्या बाळाचा आक्रोश ...
कुठे ही असूद्या ती माता नक्कीच पान्हा फुटेल तिला 
पण प्रश्न आहे एक तिचा...
त्या बाळाला हवी त्याची माता
मी शोधात आहे तिच्या 
सांगा मदतीस कोणी धावणार का...?
आज तरी त्या बाळाला माय त्याची मिळणार का...?
पहा त्याच्या भोवती कसे कुत्रे गोळा झाले आहेत 
घेऊन वास भुंकतात त्याला...
हे हाल कोण त्यास दिले आहेत...?
सांगा का रडतंय ते बाळ याचं उत्तर मला दयाल का..?
डोळे असून का आंधळे झालात 
ते उघड्या डोळ्याने पहाल का...
तिचा नी त्याचा आकांत, आक्रोश ऐकून 
जागे तुम्ही व्हाल का...?

गायकवाड आर.जी.दापकेकर
नांदेड
९८३४२९८३१५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama