Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

swati Balurkar " sakhi "

Inspirational

4  

swati Balurkar " sakhi "

Inspirational

आजची ती!

आजची ती!

1 min
414


आजची ती

काय काय करते है. . 

पण अपेक्षांचं ओझं मात्र

दिवसेंदिवस वाढते आहे!

शारिरीक श्रम कमी झाले म्हणून

वेळ ती काढायला लागली आणि

कधी हौस , कधी गरज , कधी कर्तव्य म्हणून

स्वतःला झोकून द्यायला लागली!

नवीन सगळं तिने आत्मसात केलंच. . पण

जुन्यातून तिचा पाय काही निघालाच नाही!

हे हवं , त्या यायलाच हवं हे ऐकताना तिने

तंत्र ज्ञान,यंत्र आणि माउसवर ठेवला हात 

पण डोकं नोकरीत मन घर कामात

आणि स्वयंपाकघरातून पाय मात्र तिचा निघाला नाही!

कधी कधी वैतागते ती पण

शिक्षण- करियर किंवा संसार

यातलं एकच निवडायला हवं होतं. . 

पण सगळच बेस्ट करू शकते . . 

हे पण सिध्द करायचंच होतं!

ओढाताण किती . . बुद्धीची अन शरीराचीही

तेव्हाच तर पावती मिळते तिला 

आधुनिक स्त्री असल्याची!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational