Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

manasvi poyamkar

Others

4.3  

manasvi poyamkar

Others

आईविना भिकारी

आईविना भिकारी

1 min
5.5K


साता जन्माची धनदौलत साठवली तरी

मोठी तुझ्या प्रेमाची माधुकरी

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

देवसंताचे अभंग थोर गोडवे तुझे उच्चारी

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

'माई माई 'मनातून येई आर्त हाक

जणू तहानलेल्या पिलांची मृगजळी भाक

आयुष्याच्या रथाचे चाक तुजविण कोण दाखवी दिशा खरी

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

तुझा एक आशीर्वाद साता जन्माची पुण्याई

पाप सारे मिटती, मोक्ष क्षणात प्राप्त होई

चुकलेल्या या जीवाचे जीवन तूंचि उदंडहारी उद्धारी

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी


Rate this content
Log in