Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Kendre

Children

2  

Varsha Kendre

Children

आईस पत्र लेखन

आईस पत्र लेखन

1 min
45


          //श्री//   


 तीर्थरूप आईस,

        सा. न. वि. वि. पत्र लिहिण्यास कारण की माझ्या घरी

 मी सुखरूप आहे तू ही असशील अशी आशा करते.

      आज तुझ्याबद्दल मला लिहिण्याची संधी मिळाली म्हणून मी खूप आनंदी आहे. आई तू जशी रूपाने सुंदर आहेस तशीच मनानेही खूप सुंदर आहेस. तुझ्या गुणांचे कौतुक करण्यास मला आकाशाची शाई करावी लागेल. तुझ्यातील प्रत्येक गुण वाखाणण्याजोगा आहे. प्रेमळता, सोज्ज्वळता, मृदुता, आदर्श पत्नी, परिस्थितीनुसार कठोरता, गंभीरता, धीरता अशा विविध गुणांनी परिपूर्ण अशी तू मला सदैव प्रिय आहेस. आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी ही खंबीरपणे उभे राहणे हे तुझ्याकडून शिकावे. लक्ष्मी आणि सरस्वती तुझ्या मध्ये अगदी ठासून भरलेले आहेत.' प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो' हे तू सिद्ध करून दाखवले आहे. तू सदैव तुझ्या सुनांचे कौतुक करतेस. तू माझ्यासाठी एक आदर्श माता आहेस. तुझी अध्यात्मिक वृती आणि शिक्षणाबद्दलची आवड लिखाणातून व्यक्त करण्यासाठी मला खरोखर शब्द अपुरे पडतील. तू आम्हा तीन भावंडांना स्वतःच्या पायावर उभं केलं. याकरिता तुझी महती गावी तितकी कमी. तुझ्यासारखी आई मला लाभली हे मी माझे भाग्य समजते.

 जन्मोजन्मी तूच मला आई रूपात मिळावी ही ईश्वर चरणी प्रार्थना करते.

                तुझीच,

                 वर्षा

         


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children