Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Kale

Others

4.3  

Savita Kale

Others

आईच्या छायेत

आईच्या छायेत

1 min
183


जीवनाच्य सागरात एक किनारा असा असतो

थांबून त्या किनाऱ्यावर जीव माझा विसावतो


तो किनारा असे आई

शब्द हा ऐकताच मन हरवून जाई

दूजा आधार मला ना ठाऊक

जो तो होतो इथेच भावुक


प्रारब्ध लिहिणा-याने

कुबेर मजला बनविले

केला विचार माझा किती

आईच्या कुशीत ठेविले


दाटून येई अंधार

ना कोणी सखा सोबती

आईच घेते जवळ

मायेने हात फिरविती


वाळवंट किती तापला

चटके बसू नये लेकराला

म्हणून देवाने घाट घातिला

ठेविले आईच्या छायेत त्याला


Rate this content
Log in