Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

आईचे नाव कुठेच नसते

आईचे नाव कुठेच नसते

1 min
127


आई देते जन्म

नाव बापाचे लावायचं असते

त्याच्याशिवाय नावा 

पूर्ण होत नसते

प्रत्येकाच्या नावात

बापाचेच नाव लिहायचे असते

आईचे नाव मात्र कुठेच नसते


शाळेत नाव टाकायचं म्हटल्यावर

बापाच नाव विचारतात 

मगच शाळेत प्रवेश देतात 

कारण बापाच्या नावाशिवाय 

शिक्षण मिळत नसते

आईच्या नावाला मात्र 

काहीच महत्त्व नसते


जिथे तिथे बापाच्याच 

नावाचा दबदबा असतो

आईलाही बापाच्याच नावा 

आधार घ्यावा लगतो

कारण बापाच्या नावाशिवाय

आईचेही नाव अपूर्ण असते

म्हणून आईचे नाव कुठेच नसते


बाप कारभारी 

तर आई घर सांभाळत असते

आईशिवाय घराला घरपण नसते

तरीही बापाच्याच नवाचा 

बोलबाला असतो

आईच्या नावाचा शंक 

कुठेच वाजत नसतो

बापाच्या नावामुळे 

ओळख होत असते  

म्हणून आईचे नाव कुठेच नसते 


खरतरं आईशिवाय जन्म होत नाही

बापाच्याजागी आईच नाव कोणी लावत नाही

प्रत्येकाच्या नावात

बाप आवश्यक असतो

त्याच्याशिवाय सातबाराही नसतो

म्हणून बापाच नाव

पिठ्यानंपिठ्या कायम असते

आईचे नाव मात्र कुठेच नसते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational