Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Patwardhan

Inspirational

2  

Manisha Patwardhan

Inspirational

आई

आई

1 min
32


आई नावाचं रसायन

असतंच आगळ वेगळं !!

प्रेम करण्याच तिचं

तंत्रच किं हो निराळं !! 


कधी चुकीचे वागता मी

पाठीत धपाटे मिळतील चार !!

रडून गोंधळ घातला किं

प्रेमळ मायेचे शब्द अपार !!


शिस्त लाविल , समजावेल

नाही ऐकले तर , रागाने अबोला धरेल

पण तिचा कसा बरं अबोला टिकेल ?

घट्ट मिठी मारून , मीच रडेन !!


कधी मला बरंबिर नसलं

तिच्या जीवाला थाराच नसेल !!

उशा पायथ्याशी , बसून माझ्या

हळूच पदराने डोळे पुसेल !! 


काढून ठेविल ,माझ्यासाठी

 स्वतःच्या घासातला घास ...

मला नकोय रे ... म्हणेल..

जरा होतोय मला पोटाचा त्रास !!


लांब गेलो असलो तरी..

सदैव ती काळजीत दिसेल !!

नित्यनेमे दारामध्ये ...

माझीच वाट पहात असेल !!


आई म्हणजे ... वेगळंच विश्व

डोळे मिटताच , समोर दिसावं !!

माता , जननी .. काहीही म्हणा

दिनरात मुखात *आई* ग यावं !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational