आई
आई
1 min
14.6K
आई तुझ्यासाठी
घास माझा अडला
तुझ्याविना माझा
हुंदका असा दाटला
मूकपणाने मी
आवंढाही गिळला
पापण्याआड अश्रूंचा
जल्लोष झाला
चुकवीत नजर
अश्रूंचा निचरा केला
आठवणीने तुझ्या
काळजाचा ठोका चुकला
पावलांच्या स्पंदनाने
स्पर्शही मोहरला
आई असल्याचा
भास मला झाला
प्रतिमेच्या सावलीने
भ्रमनिरास झाला
आई हा शब्द माझ्या
शब्दकोषातून हरवला.