आई...
आई...


आधार संसारा
तेल मिठ जरी
करी कष्ट सदा
अशी माझी आई ......१
दिवस पाचला
सुरु तीचा होई
रात्री झोपे कधी
कळलेच नाही.......२
गृहउदयोग तो
पापड लाटती
मान पाठ एक
कष्टात हासती.......३
रेल्वेचे रूळ ते
ओलांडता कधी
सटकला पाय
वेदना न दावी.......४
एक एक वस्तु
घरात घेतली
हप्त्या हप्त्याने हो
रक्कम फेडली.....
.५
लेकरांच्या इच्छा
सदा ती पुरवी
नाही पाया कधी
चप्पल ती नवी......६
शिक्षण घ्यायला
शाळेत पाठवी
सहलीस जाण्या
कधी ना आडवी.......७
चॉकलेट बांधी
कष्ट कोठे कमी
जीवनी गोडवा
नेहमीच ठेवी..........८
तीच्या पुण्याईची
फळे ती मिळाली
नोकरी लागता
विसरलो नाही.........९
आई आहे आज
आमच्या सोबती
सुख हवे काय
दुसरे पदरी ?..........१०