आभासात मोगरा भासला.न!
आभासात मोगरा भासला.न!

1 min

202
केव्हा तरी एकदा,
नभ आकाशी होऊनी..
घेईन पंखात माझ्या,
रंग निळाई लेवूनी....१.
झिलईत तद्रुप माझे,
उधळेन रंग वेडे..
घेईन झोके पुन्हा,
मनाचे इंद्रधनुषी कोडे....!२.
ते..मृण्मयी कस्तुरी,
गंध वेडे केवड्याचे..
त्या जलधारांच्या नक्षीत,
ताल..गजर..मृदंगाचे....! ३.
मिसळुन जाईन एकदा,
धुंदीत त्या वार्याशी..
होईन तल्लीन पुन्हा,
एकदा मी पावसाशी....! ४.
देऊन पाहिली हाक मी,
होती एकदा..सुखाला..
ते...सुख...दूर..उभे,
आभासात तो मोगरा भासला....!! ५.