Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vanita Shinde

Romance

3  

Vanita Shinde

Romance

५२ आठवडे स्पर्धेसाठी कविता नं.

५२ आठवडे स्पर्धेसाठी कविता नं.

1 min
268



*काय पाहिलंस माझ्यात*


ना रुप ना रंग तुजसम

ना ही कसलाच मेळ,

काय पाहिलंस माझ्यात

तू देऊन मजला वेळ.


दु:खाच्या हरक्षणी तू

दिलास खंबीर आधार,

झेललीस सर्व संकटे

सुखांना आणली बहार.


डगमगता पाऊल माझे

सावरले तू देत विश्वास,

संपणा-या जीवनास या

दिलास तू पुन्हा श्वास.


अनमोल ठेवा मायेचा

तुजपाशी आहे अपार,

समज, उमज तुझी ती

हृदयाची छेडते तार.


अबोल प्रित होती तुझी

नजरेतून मज दिसली,

पाहताक्षणी भारावून

मनातून गोड हसली.


नव्हती तुला हाव कधी

सौंदर्य अन् दिखाव्याची,

नाही पाहिलास चेहरा

कबुली दिलीस प्रेमाची.


निर्भिड तू सुंदर,सुस्वभावी

सारेच काही आहे तुझ्यात,

विचार हाच येतो मनात की

तू काय पाहिलंस माझ्यात.


Rate this content
Log in