पोरगा बापाला विचारतो तुम्ही काय केले माझ्यासाठी? बापाला सांगता येत नाही हिशोब नसतो कशाचा धोधो रडतो रांगडा बाप
माय जरी जन्माची शिदोरी बाप घराची सावली असतो विसरून हे चालणार नाही कारण तो एक बाप असतो
लेक म्हणून आली पोटी माय बाप नशीबा कोसी पहिली बेटी धनाची पेटी हे ठावं नव्हतं तयांसी
बापाविषयी....
बापाचे कष्ट आणि त्याचे महग
बाप उन्हात राबून करीतसे कामधंदा शेत पिकवून बाप होई जगाचा पोशिंदा