Balika Shinde
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2018,2021 - NOMINEE

36
Posts
153
Followers
0
Following

मला कविता लिहायला आवडतात,डान्स करायला खूप आवडते...स्वतः मध्ये रमायला तर त्याहूनही जास्त आवडते....

Share with friends
Earned badges
See all

भाऊ वहीनी आली म्हणून बदलत नाही तर फक्त जबाबदारीकडे झुकला जातो. .... लहाणपणी सोबत खेळणारा, मोठं झाल्यावर लाड करणारा भाऊ लग्न झालं की थोडासा वेळ कमी देतो पण म्हणून तो बदलला असं होत नाही. .. आजही तो तितकीच बहीणीची काळजी करतो जितकी तो पूर्वी करायचा पण वेळ द्यायल कमी पडतो म्हणून भाऊ बदलला असं होत नाही. .. भहीण म्हणून आपणही समजून घ्यावं... त्याच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा त्याच्या अपेक्षेला उतरावं...

शब्दांची योग्य ती सांगड घालून तो रोज कविता बनवतो. .... भावनेची गुंफन बांधून ती रोज त्याच्या कविता वाचते. ... विचारांची देवाण घेवाण सुरु होते... नातं मैत्री पर्यंत येतं. .. मत जुळायला लागतात. .. संवाद वाढतो, चांगल्या वाईट गोष्टी पटायला लागतात आणि ते नातं नवीन वळण घ्यायला लागतं. ... ते नातं म्हणजे सुंदर ,प्रेमळ, स्वच्छ असं प्रेमाचं नातं...

स्त्रीच्या वाणीत जी ताकद असते ती तलवारीत सुद्धा नसते. .... तलवारीने दिलेले घाव एकवेळ बरे होतील पण स्त्रीने बोलल्या शब्दांची तीव्रता कमी होणार नाही. .. तलवार माणसाला एका झटक्यात संपवते पण स्त्रीने ठरवले तर ती आपल्या वाणीने माणसाला क्षणाक्षणाला मारते. .... फक्त वेळ ,काळ, प्रसंग, व्यक्ती बघून बोलायला जमले की स्त्रीने जग जिंकलेच म्हणून समजा....

आजची वेळ उद्या राहणार नाही पण तू दिलेलं दुःख नक्कीच लक्षात राहील. .... वेदनांची तिव्रता जरी कमी झाली तरी नाराजगी तशीच कायम सोबत राहील. .... मी दिलेला वेळ भरून निघणार नाही पण तू दिलेली जखम तरी कुठे भरणार आहे. .... माझ्याकडून मैत्री होती पण तुझ्याकडून फसवणूक होती हे कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे... --🦋सपना शिंदे🍂--

अपयश हे अनाथ असते..... यशाचे हजारो नातेवाईक असतात..... अपयश पदरी पडले की जवळचे नातेवाईक परक्यासारखे वागतात. ... यशाची शिखरे गाठली की माहीत नसलेले लोकही ओळख दाखवायला लागतात. ...

सख्याच्या नावाच्या मेंहदीचा रंग हातावर चढतो. ... प्रीतीचा गंध मनात दरवळतो. .. हिरवा चुडा हातात शोभून दिसतो. .. साजशृंगार नव्या नवरीला अजून खुलवतो. ..

मुलगी आईवडिलांची शान असते. .. संस्काराची खान असते. ... हिरेमोती फिके पडतील तीज समोर अशी ती खजिना असते. ... लाखमोलाच्या लेकीवर वाईट , पापींची नजर पडू नये म्हणून तिला काही बंधन घातलेली असतात. .. मुलींनो ती बंधनं नसतात गं तुमच्याभोवती संरक्षण रूपी प्रेमाचं कुंपण असते. ...

आपलं आयुष्य किती रंगबेरंगी असते. ... अगदी आकाशातल्या इंद्रधनुष्याप्रमाणे, वेगवेगळ्या छटांनी भरलेले वेगवेगळ्या माणसांनी नटलेले वेगवेगळ्या अनुभवाने रंगलेले कधी रडवते तर कधी हसवते कधी स्वप्न दाखवते तर कधी अस्तित्वात घेवून येते. ....

शब्द दिसतात तितके साधे, सोपे नसतात... त्यांचा योग्य ठिकाणी ,योग्य त्या वेळी उपयोग केला तर ते तलवारीचे काम करून एखाद्याला जखमी करू शकतात. . तर सुईचे काम करून एखाद्याच्या मनाची जखम भरुन काढू शकतात. .. म्हणून शब्द जपून आणि मोजकेच वापरावेत. ..


Feed

Library

Write

Notification
Profile