मी वैशाली फाटक-काटकर लेखिका/कवयित्री असून २०१७ मध्ये कथासंग्रह 'अनामिक'ने लेखन विश्वात पाऊल ठेवले. पदार्पणातच माझ्या कथासंग्रहाला महाकवी कालिदास कविकट्ट्याचा (धुळे) साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. तसेच अनेक लघुकथा आणि कवितांना पारितोषिके मिळाली. भारताबरोबरच अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातून दिवाळी... Read more
मी वैशाली फाटक-काटकर लेखिका/कवयित्री असून २०१७ मध्ये कथासंग्रह 'अनामिक'ने लेखन विश्वात पाऊल ठेवले. पदार्पणातच माझ्या कथासंग्रहाला महाकवी कालिदास कविकट्ट्याचा (धुळे) साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. तसेच अनेक लघुकथा आणि कवितांना पारितोषिके मिळाली. भारताबरोबरच अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातून दिवाळी अंक/मासिकांमधून साहित्याला सातत्याने प्रसिद्धी मिळत आहे. साहित्य क्षेत्रात अवघ्या दोन वर्षांत चौदा पारितोषिके.
वैयक्तिक आणि सामुहिक कथा लिखाण मार्गदर्शनासाठी 'ऑनलाईन कथालेखन कार्यशाळा' आयोजन फेब्रुवारी २०२० पासून करत आहे. ह्या नावीन्यपूर्ण उपक्रमाला लेखकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १००+ मार्गदर्शनोत्सुक कार्यशाळेत सहभागी झाले.
BSc (Statistics) नंतर MCA (Master of Computer Applications) मुंबईत पूर्ण करून, भारतात आणि परदेशी Information Technology (IT) क्षेत्रात विविध पदांवर काम केले. तसेच Computer Science - Head of the Department आणि IGCSE (Cambridge International Syllabus) Examination Coordinator, ह्यासारखी शिक्षणक्षेत्रातील पदे एकाच वेळी सांभाळली. मी ‘बावीस’पेक्षा अधिक वर्षे महाराष्ट्राबाहेर स्थायिक असून, सध्या ऑस्ट्रेलियात वास्तव्य आहे.
प्रकाशित साहित्य
• कथासंग्रह 'अनामिक':
वेगळ्या आशयाच्या असल्या तरी, 'अनामिक' नाती ह्या एकाच सूत्राखाली बांधल्या गेलेल्या चार दीर्घकथांचा संग्रह: ‘तुझ्या-माझ्यात’, ‘लपंडाव’, ‘रियुनियन’ आणि ‘गेले... ते दिन गेले!’ कथासंग्रहाचे मुखपृष्ठ मी स्वतः फोटो काढून तयार केले आहे.
आधुनिक काळातले काही नाजूक प्रश्न सहजतेने मांडून, ते समस्या होण्यापूर्वी, सुसंस्कृत आणि प्रगत विचारसरणीच्या आधारे, वेगळ्या प्रकारे हाताळता येतात ह्याची जाणीव कथा करून देतात. प्रत्येक कथा एका मुख्य विषयावर आधारित असली, तरी 'तुझ्या-माझ्यात' ही केवळ प्रेमकथा न राहता अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला लावते, 'लपंडाव'मध्ये कॉर्पोरेट आणि युवा पिढीचे जग वेगळी दिशा घेताना दिसते, 'रियुनियन' कथा येणाऱ्या प्रत्येक धूसर वळणावर काय घडणार ह्याची उत्सुकता वाढवते; तर 'गेले... ते दिन गेले!'मध्ये आयुष्यातील टप्पे आपल्याला घडवत, जबाबदाऱ्या पेलण्यासाठी खंबीर करतात ह्याची प्रचिती येते.
‘नाती’ हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, तितकाच तो गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे काही बंध 'सर्वमान्यांच्या' चौकटीत न बसल्याने किंवा त्यांना कायद्याच्या भाषेत ठराविक नाव देता येत नसल्याने 'अनामिक' राहातात. व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवून लिहिलेल्या कथा, काळाप्रमाणे आपण आपली विचारसरणी बदलली पाहिजे हा संदेश नक्कीच देतात. कथा आपल्या सभोवती घडणाऱ्यांपैकीच एक आहे असे वाटते आणि वाचक वास्तविकतेशी तसेच सद्य परिस्थितीशी त्यांचा संबंध लावू शकतील. सर्वांच्या मनात दडलेल्या विचारांची, कथांद्वारे केलेली सुसूत्र बांधणी आपल्याला भावली; तर नकळत एक 'अनामिक' नाते निर्माण होत जाईल...
(कथासंग्रहाचे परीक्षण तसेच परिचय महाराष्ट्र टाइम्स, सकाळ आणि सामना वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे)
• 'अनामिक' कथासंग्रहातील 'रियुनियन' कथा YouTube वर व्हिडीओ रूपात माझ्याच आवाजात https://youtu.be/LiRl-dutRfQ
• शब्द फुलोरा ह्या महाराष्ट्र साहित्य परिषद(कल्याण) प्रकाशित प्रातिनिधिक कथासंग्रहात पारितोषिक प्राप्त कथा ‘...जस्ट फ्रेंड्स...’
• 'ऊर्मी' खऱ्या सौंदर्याची जाणीव करून देणारी, आधुनिक काळातील कथा प्रतिलिपीवर प्रकाशित.
https://marathi.pratilipi.com/story/उर्मी-UX53wiOQFWeK
• 'वाळवी' - नव्या विचारांची लघुकथा
https://storymirror.com/read/story/marathi/pmiwwxpn/vaalvii/detail?utm_campaign=website&utm_source=sendgrid.com&utm_medium=email
• 'बाहुलं' - विज्ञानामुळे लागलेले शोध आपल्यासाठी वरदान ठरले आहेत की त्याने मनुष्याचे जीवन शापित केले आहे? त्याचा उहापोह करणारी रोचक विज्ञानकथा
https://marathi.pratilipi.com/story/बाहुलं-b2qmfhomwlbr
• 'संवादिनी' ह्या कुबेर संस्थेच्या कथासंग्रहात लघुकथा
सन्मान:
• ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (बडोदा) स्वरचित कविता 'तो आणि ती'चे सादरीकरण
• २१ मार्च २०१९ रोजी ‘आम्ही लेखिका’ संस्थेने आयोजिलेल्या 'जागतिक काव्य दिनी' संमेलनाध्यक्षा
• ८ मार्च २०१८ रोजी ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने 'बालमोहन विद्यामंदिर'ची माजी विद्यार्थिनी म्हणून सत्कार झालेल्या समारंभात, ७००+ आजी बालमोहनकर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
• 'आम्ही लेखिका' संस्थेतर्फे 'साहित्यिक सत्कार'
• मराठी भाषा संवर्धन समितीच्या (पुणे) साहित्यिक कार्यक्रमात मुख्य अतिथी आणि स्वरचित कविता सादर
• साहित्याच्या उन्नतीकरिता स्टोरी मिरर - लिटररी कर्नल सन्मानपत्र
• ६ जून २०२० रोजी स्त्रियांची आत्मकथने आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात अध्यक्षस्थानी निवड
सादरीकरण:
• मुंबई आकाशवाणीच्या 'साहित्य सौरभ' कार्यक्रमात स्वलिखित कथांचे प्रक्षेपण
• लोकमान्य सेवा संघात (मुंबई) 'विज्ञान व्याख्यानमालेत' पारितोषिक प्राप्त विज्ञानकथा सादर
• मुंबई आकाशवाणीच्या ऐसी अक्षरे रसिकेमध्ये ललित बंधांचे प्रक्षेपण
• अभिव्यक्ती प्रतिष्ठान, देशिंग हरोली आयोजित फेसबुक लाईव्ह: माझ्यातल्या लेखिकेची कथा
https://www.facebook.com/789208771/posts/10157920586003772/?extid=0&d=n
• साहित्यगंध मुंबई समूह आयोजित फेसबुक लाईव्ह: अनुभवांचे संचित
https://www.facebook.com/789208771/posts/10157987421328772/?extid=0&d=n
• जीवनाचं झाड या चिंतनपर लेखमालेचे मुंबई आकाशवाणीवर सादरीकरण
• मुंबई आकाशवाणीवर, दैनंदिन जीवनात आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या विषयांवर 'चिंतन' कार्यक्रमात सादरीकरण
पारितोषिके आणि प्रसिद्धी:
• ‘लिलीचे फूल’ कथेला गो. नी. दाण्डेकर विशेष नैपुण्य पुरस्कार
• ‘मेड इन इंडिया’ ह्या विनोदी कथेला प्रथम पारितोषिक आणि सुभाषित दिवाळी अंकात प्रकाशित
• ‘अदृष्ट अनुबंधम’ ह्या विज्ञान कथेला 'मराठी विज्ञान परिषदेच्या' स्पर्धेत द्वितीय क्रमांक (२०१९)
• ‘…जस्ट फ्रेंड्स…’ कथेला महाराष्ट्र साहित्य परिषद (कल्याण) चे पारितोषिक आणि प्रसिद्धी (२०१७)
• ‘कदाचित… कस्यचित!’ कथेला ललना स्पर्धेचे पारितोषिक आणि २०१७ दिवाळी अंकात प्रकाशित.
• वि. ग. कानिटकर प्रतिष्ठानच्या कथास्पर्धेत 'चौकट'ला द्वितीय क्रमांक
• ‘एक प्रश्न’ ह्या पहिल्या स्वरचित कवितेला मराठी ग्रंथ संग्रहालयाचे पारितोषिक
• 'दृश्य अदृश्य’ ह्या आगळ्यावेगळ्या कथेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद (कल्याण)चे पारितोषिक (२०१८)
• ‘अज्ञातवास’ ह्या रहस्य कथेला सप्तर्षी प्रकाशनाचे पारितोषिक आणि शब्दशिवार दिवाळी अंकात प्रकाशित
• ‘ग्रंथाली प्रकाशन’ आयोजित परदेशी-भारतीय, बृहन्महाराष्ट्रातील लेखकांसाठी कथा स्पर्धेत तृतीय क्रमांक
• ‘त्रिशंकूचा स्वर्ग’ ह्या विज्ञान कथेची पुणे प्रतिष्ठान दिवाळी अंकासाठी निवड आणि प्रसिद्धी
• ‘वचनपूर्ती’ ह्या पहिल्या स्वलिखित लघुकथेला मोहिनीराज प्रकाशनचे द्वितीय पारितोषिक आणि प्रसिद्धी
• कलती उन्हे ह्या लघुकथेला'२०१९ च्या कुबेर फाउंडेशनच्या' कथास्पर्धेत प्रथम क्रमांक
साहित्य क्षेत्रातील उपक्रम आणि महत्त्वाच्या भूमिका
• मेलबर्न(ऑस्ट्रेलिया) येथे साहित्य समूह स्थापन करून त्यात चर्चा आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन
• 'ग्रंथाली' प्रकाशन आयोजित 'कथा-परीक्षण २०१९' स्पर्धेसाठी निमंत्रित परीक्षक
• आम्ही लेखिका समूहाच्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेसाठी २००+ कथांचे परीक्षण
• कथा लेखन मार्गदर्शनकरिता लेखन-कार्यशाळा आयोजन
• 'आम्ही लेखिका'च्यावतीने कोजागरीनिमित्त आयोजित 'उत्स्फूर्त लघुकथा लेखन' स्पर्धेचे परीक्षण
• विविध साहित्य समूहांमध्ये सक्रिय सहभाग: 'आम्ही लेखिका' संस्थेची ‘एक्झेक्युटिव्ह कमिटी मेंबर’
• आम्ही लेखिका संस्थेच्या पहिल्या ऑनलाईन संमेलनातील 'स्वतंत्र महिला साहित्य संमेलन' विषयावरील 'चर्चासत्राचे' तसेच 'लेखिकांच्या लेखनावर पुरुषसत्तेचा प्रभाव' ह्या विषयावरील 'परिसंवादाचे' परीक्षण
• २७ फेब्रुवारी २०१९ 'मराठी भाषादिनी ' शब्दसखीवर 'लेखिकांचे प्रमाण कमी का?' विषयावरील लेखांतील विशेष मुद्द्यांचे संपादन.
• महाराष्ट्रातील वाशीम गावातील विद्यार्थिनींशी व्हिडीओ कॉलद्वारे मेलबर्न येथून संवाद साधताना ऑस्ट्रेलिया आणि माझ्याबद्दल प्रश्नोत्तरातून माहिती.
आगामी
• पारितोषिक प्राप्त लघुकथांचा संग्रह 'कदाचित'चे प्रकाशन
• लवकरच माझ्या एकांकिका संहिता रंगमंचावर सादर होऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील
• 'क्षितीज आणि किनारा' ह्या २०२० मध्ये लिखाण पूर्ण झालेल्या कादंबरीचे प्रकाशन
• 'नो वरीज्' ही परदेशी राहणी, वातावरणावर आधारित लेखमालेतून. निरीक्षणातून दिसलेल्या आणि आजच्या काळात प्रकर्षाने जाणवू लागलेल्या सामाजिक मुद्द्यांवर आधारित लेख, वाचकांसमोर मांडत आहे.
• 'जीवनाचं झाड' ही चिंतनपर-लेखमाला लिहिण्यास प्रारंभ. भागांचे प्रक्षेपण मुंबई आकाशवाणीवर
• साहित्यातील विविध प्रकार हाताळत सामाजिक, कौटुंबिक, विज्ञान, विनोदी, रहस्य/गूढ, वैचारिक विषयांवरील स्वतःच्या शैलीत आधुनिक काळातल्या लघुकथा, दीर्घकथा, कविता, लेख, एकांकिका, कादंबरी लिखाण सातत्याने सुरु आहे.
• नाटक लिहिण्याचाही मानस आहे.
• 'कॉर्पोरेट' जगतावर आधारित कादंबरी लिखाण
वैशाली फाटक-काटकर
मोबाईल/ व्हॉट्सॲप: ०९८८०४१३१९३ (भारत)
+६१ ४२६६ २२११५ (ऑस्ट्रेलिया)
ईमेल: vaishalee@hotmail.com
फेसबुक पेज (Vaishali’s Writing Desk): https://www.facebook.com/vaishaliphatak.katkar/ Read less