@etsjeqi1

pooja thube
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2019 - NOMINEE130
Posts
192
Followers
0
Following

I'm pooja and I love to read StoryMirror contents.

Share with friends

Submitted on 30 Nov, 2019 at 06:19 AM

एक आठवण अशी असावी डोळ्यामध्ये पाणी आणणारी रडत रडत हसायला यावे आठवण असावी सुख जपणारी

Submitted on 29 Nov, 2019 at 07:36 AM

वृक्षतोड, प्रदूषण करत राहिला माणूस त्सुनामी नि भूकंप झाल्यावर रडत राहिला माणूस कधी कळणार त्याला निसर्गाला जपले तर आपण जगणार असतील आपली स्वप्ने ती होणार साकार

Submitted on 28 Nov, 2019 at 08:02 AM

ऐतिहासिक वारसा जपणे कर्तव्य आहे आपले शिका इतिहासाकडून नाहीतर सारे संपले

Submitted on 27 Nov, 2019 at 09:30 AM

नाजूक साजूक परी ही सुंदर आली माझ्या घरी बस म्हणाली पाठीवर फिरवीन दुनिया सारी

Submitted on 26 Nov, 2019 at 09:09 AM

असले जरी वय जास्त नि ताकद कमी अनुभव आहे ज्येष्ठांकडे आहे प्रेमाची हमी

Submitted on 25 Nov, 2019 at 15:23 PM

उंची कपड्यांनी सजलेले शरीर अत्तरांनी सुवासिक झालेलं अंग फॅशनच्या बातांनी केलेली फुशारकी चेहरा आरसा पाहण्यात दंग सारे हे एका बाजूला राही चेहऱ्यावरचे निष्कपट हसू नि मनाचं सौंदर्य सारे जग जिंकून घेई!

Submitted on 24 Nov, 2019 at 16:51 PM

गुरूंना मानावे त्यांना वंदावे लोभ मत्सर सोडावे पायाशी त्यांच्या ||

Submitted on 23 Nov, 2019 at 11:37 AM

सामाजिक विषयांकडे पहा सजगतेने नाही सोडवले ते तर नुकसान होईल सहजपणे

Submitted on 22 Nov, 2019 at 07:15 AM

रक्त आमुचे सळसळते शौर्य आमुच्या नसानसांत शिवबाचे असे मावळे आम्ही धाडस आमुच्या रगारगात

Submitted on 21 Nov, 2019 at 15:20 PM

अन्नदान असो की जलदान आहे सगळ्यात श्रेष्ठ कन्यादान दान म्हणजे करुणा दान वाढवते मान

Submitted on 20 Nov, 2019 at 08:03 AM

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं गावातील नि शहरातील सेम असतं नसतो दुजाभाव प्रेमात आणि नसते सूडभावना निखळ आनंदाचा असतो झरा प्रेमाचा थाट असतो साजरा

Submitted on 19 Nov, 2019 at 13:57 PM

बनुनी दुर्गा, चांडाळांचा संहार कर लक्ष्मी बनुनी तू, उजळ हे घर आहे तू सरस्वती, कर सगळे शिखर सर कुणापुढेही झुकू नको, तोड वाकडी नजर सलाम तुला, सलाम तुझ्या कर्तृत्वाला मनापासून सलाम आहे, तुझ्या स्त्रीत्वाला

Submitted on 18 Nov, 2019 at 09:05 AM

नाही स्वार्थाचे नाही चुकीचे आहे सुखाचे नाते हे मैत्रीचे

Submitted on 17 Nov, 2019 at 13:31 PM

चुके काळजाचा ठोका थरथरे देह हा घसा पडे कोरडा भय हे असे पहा

Submitted on 16 Nov, 2019 at 15:44 PM

ह्या दऱ्याखोऱ्यांतून नांदतो रांगडा मावळा आमुचा || वरदहस्त शिवरायांचा जनतेचा जाणता राजा ||

Submitted on 15 Nov, 2019 at 14:07 PM

आपल्याच हातात आहे दुष्काळाची समस्या सोडवणे निसर्गाचा समतोल राखला तर दुष्काळ कधी न पडणे

Submitted on 13 Nov, 2019 at 18:52 PM

माझे बालपण अवखळ निरागसपणे बागडते आजही आतले मूल आनंदाने दौडते

Submitted on 13 Nov, 2019 at 13:41 PM

धन्य ती माऊली करी लेकरावरी माया होऊ दे कितीही मोठे हवीहवीशी वाटे तिची छाया

Submitted on 12 Nov, 2019 at 13:26 PM

माझ्या महाराष्ट्रातील एक एक गड महाराजांच्या शौर्यगाथा सांगी ऐकता ऐकता तल्लीन होऊन सर्र्कन रोमांच येती अंगी

Submitted on 11 Nov, 2019 at 14:14 PM

माझ्या शेतामंदी डुले पीक वाऱ्यासंग इथं पक्षी गाती गाणी माझा बाप राबण्यात दंग

Submitted on 10 Nov, 2019 at 12:32 PM

बेरोजगारी महागाई दुष्काळ नि बरेच काही प्रश्न माणुसकीचा गहन फार काही केल्या संपत नाही

Submitted on 09 Nov, 2019 at 13:23 PM

प्रवास हा जीवनाचा कळावे कुठे थांबावे अखंड या प्रवासात सर्वांनी मिळून चालावे

Submitted on 08 Nov, 2019 at 16:44 PM

हसरा चेहरा की फसवा चेहरा थांग कोणाचाच लागत नाही जीवनाच्या ह्या रंगभूमीवर कुणी कुणाचं असत नाही

Submitted on 07 Nov, 2019 at 10:46 AM

रिमझिम बरसणारा तो पाऊस खिडकीतून डोकावू लागला सोबत वाफाळता चहा नि भजी तो मजला गोष्टी सांगू लागला

Submitted on 06 Nov, 2019 at 08:16 AM

श्रमाने वाढते ताकद नि बळकट होते भविष्य श्रमाचे महत्त्व जाण रे माणसा सुंदर बनेल आयुष्य

Submitted on 05 Nov, 2019 at 11:42 AM

"खेड्याकडे चला" उद्गार गांधीजींचे त्यांनीही जाणले महत्त्व ग्रामीण भारताचे

Submitted on 04 Nov, 2019 at 14:21 PM

अंधश्रद्धेचा वळू जेव्हा सुसाट सुटतो शहाण्याचीही मती गुंग करून टाकतो देवही मग हतबल होई निष्पापाचा हकनाक बळी जाई

Submitted on 03 Nov, 2019 at 09:42 AM

मायमराठी माझी सुंदर| अमृतातेही पैजा जिंके|| हिच्या साक्षीने घडला महाराष्ट्र| गाऊ किती कवतुके||

Submitted on 02 Nov, 2019 at 15:19 PM

छंद असावा काही मनाला होई विरंगुळा कविता कराव्या कथा लिहाव्या छंद माझा हा आनंदसोहळा

Submitted on 01 Nov, 2019 at 13:33 PM

शिवबाची थोर संस्कृती आपुल्या महाराष्ट्राची शान दिल्लीचेही तख्त राखतो माझा महाराष्ट्र महान

Submitted on 17 Aug, 2019 at 17:43 PM

हा पक्ष की तो पक्ष नुसताच गोंधळ आहे भल्याभल्यांची तुटे निष्ठा अध्यक्षांची धावपळ आहे

Submitted on 13 Aug, 2019 at 17:14 PM

My Life and Luck are like Business Partners. They have some Unfinished Deals.

Submitted on 13 Aug, 2019 at 17:06 PM

I don't search the sky for twinkling stars. I have many in my home.

Submitted on 13 Aug, 2019 at 16:41 PM

दिन के किस्से मन को भाते है| सूरज के किरण दिल लुभाते है| रोशनी से उजले आँखे पर रात में नशा ही कुछ और है|


Feed

Library

Write

Notification

Profile