Anita Bodke
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

37
Posts
98
Followers
0
Following

गझल..गझल आणि गझल

Share with friends
Earned badges
See all

ओढ देतोस तू पावसा सारखी पाहते वाट मी चातका सारखी! सांगतो बाप सांभाळुनी घ्या तिला लेक नाजूक माझी फुला सारखी! अनिता बोडके

आपले परके कळाले फार झाले! केवढे मित्रा तुझे उपकार झाले! अनिता बोडके

ना मला भय ना भिती वाटत तुझी वादळा नाही मुळी धडगत तुझी एवढाही तू नकोना घाबरू जिंदगी नाही तुला मागत तुझी अनिता बोडके

मी किती दुष्काळ सोसू? दे नभा पाऊस तू.. जीव कासावीस झाला कोरडा झाला घसा! अनिता बोडके

विज्ञानाची कास धरू या अंधश्रध्देला दूर करू या! अनिता बोडके

हा क्षणाचा फक्त आहे गारवा ठाऊक होते! जन्मभर जाळेल नंतर ही हवा ठाऊक होते! अनिता बोडके

माणसाला फक्त एक 'माणूस' होता आलं पाहिजे बस....! अनिता बोडके

ना भेदभाव कुठला ना जातपात राहो देशात बांधवाचे हातात हात राहो! स्वातंत्र्य भारताचे माझ्या अभंग आहे फडकत सदा तिरंगा सा-या जगात राहो! अनिता बोडके

यातना याचसाठी मिळू दे मला कोण माझे इथे हे कळू दे मला..! अनिता बोडके


Feed

Library

Write

Notification
Profile